गरीब कष्टकरी जोडपे नुकतेच लग्न करून नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत रहायला येतात. Daily wages वर दोघेही काम करून पोट भरत असतात. कंत्राटी कामगार म्हणून जे पैसेमिळतीलत्यात. आपला. उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत असतात. घरची थोडी फार शेती असल्याने कमीतकमी घरच्यांचा भार पेलण्याची जबाबदारी त्यांच्यावर नसते. भाड्याचे घर, शहरातले खर्च, ई भागवत त्यांचे दिवस जात असतात.

 

मूल होईल अशी खात्री…

 

लग्नाला १ वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेल्या नंतर त्यांच्या लक्षात येते कि कुठलेही गर्भनिरोधकाचे साधन न वापरता ही, आपल्याला मूलबाळ राहिलेले नाही. म्हणून ते जवळच्या GP कडे जातात. ते त्यांच्या काही जुजबी तपासण्या करून व काही गोळ्या औषधे देऊन मूल होईल अशी खात्री देतो. ६-८ महिने उलटून सुद्धा यश न आल्याने तो त्यांना परिसरातील स्त्री रोग तज्ञाकडे पाठवतो. तो त्यांची अजून काही रक्ताच्या तपासण्या, xray, वीर्य तपासून घेतो व महिन्याच्या महिन्याला सोनोग्राफी करून बीजांडकोषातून बीजांडाची निर्मिती होते का नाही या करीता प्रयत्न करतो.

या सर्व गोष्टींना पैसे तर लागतात व त्याचा पुरवठा तर नियमित नसतो म्हणून हा उपचार सलग न होता मध्ये मध्ये १-१-२-२ महिन्याचा खंड पडत असतो. ८ महिने ते वर्ष भर प्रयत्न करून सुद्धा हि काही होत नाही म्हणून स्त्रीरोग तज्ञ त्यांना दुर्बिणीद्वारे गर्भ पिशवी, बीजनलिका व बीजांडकोष यांची तपासणी करण्याचा सल्ला देतात. उपचार खर्चिक असतो म्हणून ते वेळ मागून घेतात व २-४ महिने पैसे साठवून ते डॉक्टरांकडे येतात परंतु काही वैद्यकीय कारणास्तव डॉ त्यांना महिनाभर थांबण्याचा सल्ला देतात.

दुर्बिणीची तपासणी झाल्यानंतर १-२ महिन्यांनी गर्भ राहिल्याची आनंदाची बातमी त्यांना कळते व त्यांच्या आनंदाला पारावर राहत नाही. परंतु हा आनंद अल्प काळ टिकतो कारण गर्भाला वाढ नसल्याने डॉक्टरांनी गर्भपाताचा सल्ला दिलेला असतो.

 

एका अत्यंत कठीण लढाईत

 

एका अत्यंत कठीण लढाईत पराभव हाती आल्याने परत निराशेच्या खाईत गेलेल्या या जोडप्याला समाजाच्या टोमण्यांचा व वारंवार होणाऱ्या चौकश्यांच्या ससेमिऱ्यातून बाहेर कसे पडावे हि वेगळीच चिंता. आधीच उपचारांचे ओझे, त्यात अपयशाचे खापर व नातेवाईकांचे टोमणे या तिहेरी आपत्तीत त्यांचे मानसिक संतुलन न बिघडले तरच नवल! परंतु पदरचे पैसे सांभाळत, उसनवारी घेऊन ते उपचार पुढे चालू ठेवतात.

भगवानके घर देर हैं अंधेर नहीं हैं या वाक्याप्रमाणे त्यांना पुन्हा एकदा उपचारांती दिवस राहतात व नशिबाने व उपचारांच्या मदतीने सर्व सुरळीत पार पडत असते. Precious pregnancy, अशातच पूर्वीचे abortion या परिस्थितीत काही महागडी औषधे ९ ही महिने घ्यावी लागत असतात पण मूल पदरी पडायच्या अपेक्षेने ते निमूटपणे हा खर्च करत असतात.

नशिबाने सर्व सुरळीत पार पड्ते व डिलिव्हरी अंती त्यांना एक सुदृढ आपत्य प्राप्त होते. आपल्या कष्टाचे चीज झाले म्हणून त्यांचा आनंद गगनात मावत नाही. या सर्व प्रवासात झालेले कर्ज फेडायचे ओझे त्यांच्या डोईवर असते परंतु उद्याचा उष:काल पाहण्याच्या उमेदीवर ते पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतात.

आपल्या देशातल्या गरीब सामान्य लोकांची more or less अशीच परिस्थिती आहे.

क्रमश:

Part 2

Scroll to Top