contd… असे काही अपवादात्मक जोडपे असतात ज्यांना सर्व काही प्रयत्न करून सुद्धा नैसर्गिक रित्या दिवस राहत नाहीत. साचवलेला पैसा संपत असतो. उपचारादरम्यान स्त्रीला काम सोडून घरी आरामाकरिता बसावे लागते, असे एक ना एक अनेक अडचणी येत असतात.

दोघांपैकी एकात काही दोष आढळल्यास त्यावर targeted treatment करता येते परंतु कुठे ही दोष आढळला नाही तर यश मिळे पर्यंत प्रयत्न करत राहवे लागते.

 

एका बाजूला वय…

 

एका बाजूला वय वाढत चाललेले असते दुसऱ्या बाजूला नैसर्गिक आपत्ती अथवा आर्थिक मंदी अगदीच कोरोना सारखी एखादी महामारी असे एक न अनेक संकटं आ वासून उभे असतात. या सर्व अडथळ्यातून कोणी तरी डॉक्टर कृत्रिम गर्भारोपण म्हणजेच test ट्यूब बेबी उपचारांचा सल्ला देतात. अनेक युक्त्या क्लुप्त्या करून या उपचार प्रणालीची तयारी करावी तर त्यातील यश मिळण्याची शक्यता जेमतेम. परत अशा किती treatment cycles कराव्या लागतील याचा नेम नाही. त्यात या विषयी गैरसमज पसरवणाऱ्यांची कमी नाही. अशा परिस्थितीत हि जोखीम पत्कारीत आपण ज्या डॉक्टर कडे जात आहोत त्याची नितीमत्ता व शास्त्रोक्त उपचार करण्याची इच्छा व सामग्री सुद्धा महत्वाची असते नाहीतर फसवले जाण्याचाच धोका अधिक.

परंतु टेस्ट ट्यूब बेबी ने अनेक अडचणींवर मात करून कित्येक आशा सोडून दिलेल्या जोडप्यांच्या अंधकारमय आयुष्यात प्रकाश टाकला आहे.

 

कमीत कमी पैशात लवकरात लवकर…

 

टेस्ट ट्यूब बेबी च्या १ किंवा त्यापेक्षा अधिक प्रयत्न करावे लागल्यास कोणती उपचार पद्धती योग्य आहे, काही आर्थिक मदत या जोडप्यांना होऊ शकेल का? गर्भ cryofreeze करून त्यांची शक्यता वाढवता येईल का? योग्य सल्ला देऊन त्यांची सम्मती असल्यासच व दुसरा मार्ग नसल्यास donor gametes चा विचार करून कमीत कमी पैशात लवकरात लवकर त्यांच्या आयुष्याच्या पटलावर नवे अंकुर कसें फुटेल या प्रयत्नांनी त्यांचे भले होऊ शकेल.

अशी अनेक जोडपी स्वतःच्या चिकाटीने व डॉक्टर वर पूर्ण विश्वास ठेवून, डॉ च्या ज्ञानाचा व उपलब्ध state of the art technology चा योग्य वापर करून आपले इप्सित साध्य केले आहे. आपण केलेल्या काटकसरीतून, कष्टातून आतापर्यंत गुंतवलेल्या पैशाची व कष्टाची फलश्रुती होण्यास मदत झालेली आहे.

ह्या जोडप्यांच्या व्यथा मांडत असताना त्यातून गरजूंना नवीन दिशा मिळून अंधाराच्या पलीकडे आशेचा किरण आहे हा विश्वास देण्याची ह्या उपचारांमध्ये ताकद आहे .

Comments are closed.

Scroll to Top